• Mon. Nov 25th, 2024
    राज्यात ‘एआय’ धोरणाची चाचपणी! कृत्रिम बुध्दीमत्ता पार्कसाठीही तयारी सुरू; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

    ठाणे: उदयोन्मुख तंत्रज्ञान असलेल्या कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात ‘एआय’ संदर्भात धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात हे धोरण आणले जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ठाण्यात दिली. त्यामुळे राज्यात एआय पार्कसारखी संकल्पना राबवता येणार असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
    ब्राह्मण समाजाला सातत्याने ठेचण्याचा प्रयत्न, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांची खंत
    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातही यावर चर्चा करून लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. हे धोरण झाल्यास महाराष्ट्र हे देशातील एआय धोरण तयार करणारे पहिले राज्य ठरू शकते, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी केला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ठाण्यातील एआय धोरणाबद्दलची माहिती दिली. लंडन दौऱ्या दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांची ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीतील आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) विभागाचे प्रमुख अजित जावकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जावकर यांनी देशात कोणत्याही राज्यात कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) संदर्भात धोरण नसल्यामुळे या तंत्रज्ञानाच्या वापरावरील मर्यादांची माहिती दिली.

    आरोग्य सुविधेवरुन शिवसैनिकाचा रोखठोक प्रश्न; नितेश राणेंना जाब विचारला; भाजप-सेना कार्यकर्ते भिडले

    कृषी उद्योग, वाहन उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, आयटीसह सर्व प्रकारच्या उद्योगांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. त्यामुळे यासंदर्भातील धोरण तयार करण्यासाठी अजित जावकर यांना विनंती केल्यानंतर त्यांनीही त्यास सहमती दर्शवल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली लवकर समिती स्थापन करून ह्या धोरणावर काम केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यामध्ये यासंदर्भातील धोरण आम्ही प्रत्यक्षात आणणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
    याबरोबरच राज्यात यासंदर्भात संशोधनाच्या दृष्टीने आणि या क्षेत्रातील कंपन्यांच्या विस्तारासाठी एआय पार्क उभारण्याचाही विचार सामंत यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दृष्टीने सुयोग्य ठरेल अश्या मुंबई महानगर क्षेत्रात किंवा इतर आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शहरांमध्ये हे पार्क उभारण्यात येऊ शकते. परंतु त्यासंदर्भातील निर्णय या विषयातील तज्ज्ञांकडून घेतला जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील सर्वजण सकारात्मक असल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

    श्रीकांत सावंत यांच्याविषयी

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *