• Sat. Sep 21st, 2024
बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

म. टा. प्रतिनिधी, पुणे : बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला (वय ९१ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी वास्तुविशारद शबनम पूनावाला आणि नात सना वैद्य असा परिवार आहे. सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सक्रिय कार्यकर्ते, बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे नेतृत्व ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत.

डॉ. झैनब यांनी ताहेरभाई यांच्यासमवेत बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीत उल्लेखनीय काम केले. यामुळे बोहरा समाजाने त्यांच्यावर बहिष्कारही घातला, तरी दोघेही काम करत राहिले. ‘या बहिष्कारामुळे मोठे जग पाहता आले’, असे ताहेरभाई नेहमी सांगायचे.

सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी यांसह विविध परिवर्तनवादी संस्थांच्या कार्यातही त्या दोघांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. झैनब पूनावाला यांचे पार्थिव एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे सोमवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी सामाजिक कृतज्ञता निधीचे विश्वस्त डॉ. बाबा आढाव, अन्वर राजन, डॉ. शमसुद्दीन तांबोळी आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पूनावाला यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. वैद्यकीय संशोधनासाठी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आला.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed