नागपूर: मुसळधार पाऊस बघता मंगळवार २६ सप्टेंबर आणि बुधवार २७ सप्टेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हा प्रशासनाचे फेक मेसेज समाज माध्यमावर सार्वत्रिक फिरत आहे. नागपूर महानगरातील शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था उद्या आणि परवा बंद राहतील, असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र हे चुकीचे असून शाळा महाविद्यालय नियमित प्रमाणे सुरू असतील. या चुकीच्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
भारतीय हवामान खात्याचा दुजोरा देत कुणीतरी खोडसाळपणे उद्या आणि परवा (२६ आणि २७ सप्टेंबर) रोजी मुसळधार पावसाचा इशारा देऊन शाळा कॉलेजेस बंद राहतील, असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर पसरवला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने असे कोणतेही पत्र काढले नसल्याचे सांगितल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात यावे, असे आव्हान केले आहे. हा फेक मेसेज कोणी पसरवला याबाबतची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी रात्रभर शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेलेले दिसून आले होते. संततधार पाऊस पाहता प्रशासनही सक्रिय झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सुट्टी जाहीर केली होती. यासोबतच नागरिकांना गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या दशकभरातही नागपूरकरांनी एका दिवसात एवढा पाऊस अनुभवला नाही. गेल्या वर्षी १३ सप्टेंबर रोजी २४ तासांत सर्वाधिक १२७.४ मिमी पाऊस पडला होता. विशेष म्हणजे, अनेक वर्षांतील सप्टेंबरमधील पावसापेक्षा शनिवारी २४ तासांत जास्त पाऊस झाला आहे.