• Mon. Nov 25th, 2024
    खात्यातून ७२ लाख परस्पर काढले; जिजाऊ बँकेच्या आमसभेत तरुणीने गोंधळ घातला, नेमकं काय घडलं?

    अमरावती: पश्चिम विदर्भातील अग्रगण्य म्हणून समजली जाणारी अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल बँक सध्या विविध अनियमित्येमुळे चर्चत आली आहे. आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आमसभा आयोजित करण्यात आली होती.
    शेतकरी पुत्राची कौतुकास्पद कामगिरी! आता पाण्याशिवाय दोन महिने पिके तग धरू शकतील; अनोख्या संशोधनाची सर्वत्र चर्चा
    यावेळी अचानक एका मुलीने बोलण्यासाठी हाती माईक घेतला. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष अविनाश काठोळे यांनी सभागृहाला टाळ्या वाजवून या ताईचे अभिनंदन करा, कारण ही एकटी महिला बोलतात असे म्हटले. मात्र काही काळानंतर या युवतीने बँकेने तिच्या वडिलांच्या खात्यातून परस्पर बहात्तर लाख रुपये काढण्याचे प्रकरण सभागृहासमोर मांडले. त्यावेळी अध्यक्षांनी तात्काळ पोलिसांना मुलीच्या हातचा माईक घ्या अशा सूचना केल्या.

    घोटाळ्याचा आरोप, ८ वर्षांचा तुरूंगवास, जामीनावर सुटताच रमेश कदमांचं जंगी स्वागत

    अध्यक्षाच्या या सूचनेमुळे या युवतीने सभागृहात चांगला गोंधळ घातला. यावेळी तिचा संताप पाहून पोलीसही तिच्या आजूबाजूला यायला तयार नव्हते. शेवटी सभागृहातील जेष्ठ सभासदांनी तिला शांत केल्यानंतर या प्रकरणाची योग्य ती चौकशी करू, असे आश्वासन दिले. जिजाऊ बँकेच्या या आजच्या आमसभेत युवतीने घातलेला राडा चर्चेच्या मध्यभागी राहिला. याचा व्हिडिओ महाराष्ट्र टाईमच्या हाती लागला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed