• Mon. Nov 25th, 2024

    विजा कडाडत असताना लॅंडलाईन की मोबाइल वापरावा? हवामान खात्याने दिली माहिती

    विजा कडाडत असताना लॅंडलाईन की मोबाइल वापरावा? हवामान खात्याने दिली माहिती

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या विजांच्या कडकडाटाने नागपूरकरांच्या कानठळ्या बसल्या. आकाशात विजांचे युद्ध सुरू आहे असे वाटावे इतका, हा विजांचा कडकडाट भयंकर होता. अशी परिस्थिती परत आल्यास जीवितहानी होऊ नये, यासाठी हवामान खात्याने इशारा दिला आहे. विजा कडाडत असताना नागरिकांनी लॅँडलाईन फोन वापरण्याऐवजी मोबाइल फोनचा वापर करावा, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

    लँडलाईन फोन विजेचे संचालन करू शकतात. त्यामुळे विजा कडाडत असताना लँडलाइन फोन वापरणे टाळावे. आपत्कालीन संवादासाठी मोबाईल फोन वापरावा, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

    बॉलिवूडवर शोककळा; १०० हून अधिक गाणी, सिनेमे लिहिणाऱ्या प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शकांचं निधन

    अगदी आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नका. चेतावणीशिवाय वीज पडू शकते आणि ते अत्यंत धोकादायक आहे. तसेच पाणी हे विजेचे उत्तम वाहक आहे त्यामुळे या काळात पोहणे किंवा आंघोळ करणे टाळावे. याखेरीज इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अनप्लग करून त्यांपासून दूर रहावे. तसेच विजा काचा फोडू शकतात आणि धातूद्वारे वाहू शकतात. त्यामुळे खिडक्यांपासून दूर राहा. याखेजी लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, झाडे विज आकर्षित करू शकतात. त्यामुळे चुकूनही झाडांखाली आश्रय घेऊ नका. त्याऐवजी भक्कम, बंदिस्त इमारतीत आश्रय घ्या. वादळ निघून गेल्यावरही वीज पडू शकते. त्यामुळे अखेरच्या मेघगर्जनेनंतर किमान ३० मिनिटे घरात रहा, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *