मुंबई : महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या २४ तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज रविवार असून नागरिकांनी दिवसभरात घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात आज अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट असून विदर्भात पावसाचा जोर जास्त असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुढच्या २४ तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर २७ सप्टेंबरपर्यंत फक्त विदर्भात पावसाचा जोर असेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, कोकण, रत्नागिरी, रायगड, ठाणे, या जिल्ह्यांना २७ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये शुक्रवारपासूनच पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं. अशात आजही पुण्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे तर कोकण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढच्या ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहे.