छत्तीसगड सीमेवर असलेल्या भामरागड तालुक्यातील लाहेरी हे शेवटचा ग्रामपंचायत याच ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ठ कोयर या गावात साहिबी पुंगाटी यांचे निधन झाले.याची माहिती मिळताच लाहेरी परिसरातील नागरिकांना (नातेवाईक) २१ सप्टेंबर रोजी कोयर ला अंत्यदर्शनासाठी जायचे होते.मात्र, मागील काही दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने या भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.अश्या परिस्थितीत या भागातील महिला-पुरुषांनी एकत्र येत नाल्याच्या दोन्ही बाजूला झाडाला दोरी बांधून स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोयर गाव गाठले अन अंत्यदर्शन घेतले.या संघर्षाचे काही चलचित्र मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमात व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्याच्या आदिवासीबहुल अतिदुर्ग भागाच्या विकासासाठी राज्य केंद्र शासनाकडून मोठा निधी खर्ची घातला जातो. या माध्यमातून आजमितीस हा परिसर विकासाच्या प्रवाहात येत असला तरी येथे रस्ते, पूल व वाहतुकीच्या साधनांचा प्रचंड अभाव आहे.त्यामुळे या भागाचा विकासाला खीळ बसली आहे.लाहेरी पलीकडे जवळपास १० ते १२ गावांचा समावेश आहे.या भागात अजूनही मुख्य रस्ते,नदी-नाल्यावर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात मोठा संघर्ष करावा लागत आहे.पावसाळ्यात रुग्णनांना देखील खाटेवर,झोळीत किंव्हा,खांद्यावर घेऊ। यावे लागते.ही परिस्थिती केवळ या भागातील नागरिकांचीच नाही तर लगतच्या छत्तीसगड राज्यातील रुग्णांना देखील याच परिस्थितीचा सामना करावा लागतो.
भागात मोठे रुग्णालय नसल्याने लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय दुसरे पर्याय नाही.मात्र,लाहेरी गाठण्यासाठी पावसाळ्यात जीव धोक्यात टाकून जल प्रवास करावा लागतो.२१ सप्टेंबर रोजी अंत्यदर्शन घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना याच परिस्थितीचा सामना करावा लागला.त्यात पुरुषांसोबत महिलांचाही समावेश होता.तर अंत्यदर्शनासाठी लागणारा सामान सुद्धा याच परिस्थितीत घेऊन जावं लागला.या कठीण परिस्थितीचा काही युवकांनी चित्रीकरण केले.त्याचे चलचित्र मोठ्या प्रमाणात आता समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहेत.