• Mon. Nov 25th, 2024

    शेतकऱ्याने बियाणे खरेदी केले, पेरणी केली पण सोयाबीन उगवलेच नाही; ग्राहक आयोगाचा कंपनीला दणका

    शेतकऱ्याने बियाणे खरेदी केले, पेरणी केली पण सोयाबीन उगवलेच नाही; ग्राहक आयोगाचा कंपनीला दणका

    म.टा. प्रतिनिधी, यवतमाळ: खरेदी केलेले सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगाने बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक प्रा.ली. कंपनीला दंड ठोठावला आहे. ग्राहक आयोगाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

    बाभुळगाव तालुक्यातील अंतरगाव येथे चंद्रकांत केशवराव तिजारे यांची सामूहिक शेती आहे. त्यांनी चालू खरीप हंगामासाठी यवतमाळ येथील राजदीप एजन्सीमधून बुस्टर कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले. शेतात तूर आणि सोयाबीनचे मिश्र पिके घेण्यासाठी पेरण्या केल्या. यासाठी आवश्यक खर्च केला. मात्र, तुरीचे बियाणे उगवले पण सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे हतबल झालेल्या तिजारे यांनी बियाणे विक्रेते राजदीप एजन्सीशी संपर्क साधला. मात्र, राजदीप एजन्सी या विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे देत त्यांच्या तक्रारीची दखलच घेतली नाही. शेवटी न्याय मिळावा म्हणून तिजारे यांनी जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

    ६० टक्के सोयाबिन पावसा अभावी करपलं; लाखांत खर्च, हजारांत मदत?, शेतकऱ्यांना अग्रिम विम्याची प्रतिक्षा

    यात राजदीप एजन्सी आणि बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक प्रा.ली. या दोघांना प्रतिवादी करण्यात आले. जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे आणि सदस्य हेमराज ठाकूर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आयोगाने दोन्ही बाजू जाणून घेतल्यावर, बुस्टर कंपनीचे सोयाबीन सदोष असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बाभूळगाव तालुका कृषी विभागाच्या समितीनेही बुस्टर कंपनीचे सोयाबीन बियाणे सदोष असल्याचा अहवाल दिला होता. हा अहवाल महत्त्वाचा ठरला. बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याने नुकसानापोटी बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक कंपनीने तक्रारकर्त्यास ३ लाख ३५ हजार ६९० रुपये आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी १० हजार आणि तक्रारखर्चाचे तीन हजार रुपये द्यावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिले.

    नुकसानाची ही रक्कम ४५ दिवसांत कंपनीने तक्रारकर्त्या शेतकऱ्याला द्यावी. अन्यथा पुढे या रकमेवर ९ टक्के व्याज आकारला जाईल, असे आयोगाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. विक्रेते राजदीप एजन्सी यांनी बियाणे कंपनीकडून आलेला माल तसाच शेतकऱ्याला विकला. त्यामुळे विक्रेत्याला जबाबदार धरता येणार नाही. म्हणून त्यांचा दोष असल्याचे दिसत नसल्याने त्यांना आरोपातून मुक्त करण्यात आले.

    Pune Crime: वडिलांच्या कर्जापायी लेकानं स्वत:च्या आयुष्याची दोर कापली; एका चिठ्ठीमुळे गुन्हा उघड

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed