• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई लोकलबाबत महत्त्वाचा निर्णय: गर्दी नियोजनासाठी जलद लोकलना या दिवशी सर्व स्थानकांवर थांबा

    मुंबई लोकलबाबत महत्त्वाचा निर्णय: गर्दी नियोजनासाठी जलद लोकलना या दिवशी सर्व स्थानकांवर थांबा

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सव विसर्जनातील संभाव्य गर्दी नियोजनासाठी गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८.३० दरम्यान धावणाऱ्या सर्व जलद लोकलना मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. चर्नी रोड स्थानकातील गर्दी नियोजनासाठी सायंकाळी ५ ते रात्री १०पर्यंत फलाट क्रमांक दोनवर धीमी लोकल थांबणार नाही.

    अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीची भव्यता पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा यांसह अन्य मंडळाच्या गणरायांचे मिरवणुकीत दर्शन घेण्यासाठी प्रवाशांचीही धावपळ सुरू असते. यामुळे जलद लोकलला सर्व स्थानकांत थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एरवी गर्दीच्या वेळेत चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अन्य रेल्वे स्थानकांवर लोकल थांबत नाहीत. या निर्णयामुळे गिरगाव चौपाटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

    Chandrayaan 3 :विक्रम लँडर अन् प्रज्ञान रोवरशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु, इस्त्रोनं दिलेली अपडेट नेमकी काय?

    दरम्यान, विसर्जनाच्या दिवशी चर्नी रोडच्या फलाट क्रमांक दोनवर प्रचंड गर्दी उसळते. गर्दीमुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी सायंकाळी ५ ते रात्री १०पर्यंत फलाट क्रमांक दोनवर कोणतीही लोकल उपलब्ध राहणार नाही, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विसर्जनानंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेकडून मध्यरात्री आठ विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *