• Sat. Sep 21st, 2024

पुण्यातील पाबे घाटात दरड कोसळली; वाहतूक काही काळासाठी ठप्प, सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन

पुण्यातील पाबे घाटात दरड कोसळली; वाहतूक काही काळासाठी ठप्प, सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन

पुणे : पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून वेल्हे तालुक्याची ओळख आहे. वेल्हे तालुक्यात पाऊस सुरू झाल्याने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. त्यातच आज सायंकाळच्या सुमारास रांजणे गावाकडून वेल्हेकडे येणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. हा भाग दुर्गम असल्याने डोंगराळ भागातही लोकांचं वास्तव्य आहे. दरड कोसळल्याने नागरिक भयभीत झाले असून घाटात ही दरड अचानक कोसळल्यानंतर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र प्रशासनाने सतर्कता दाखवत दरड हटवली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वेल्हे तालुक्यात घाट माथ्यावर पडत असलेल्या कमी-अधिक पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. पाबे घाटात दरड कोसळली असल्याची माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांना समजताच त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे.काम सुरू केले.

मुंबई लोकलबाबत महत्त्वाचा निर्णय: गर्दी नियोजनासाठी जलद लोकलना या दिवशी सर्व स्थानकांवर थांबा

दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दरड हटविण्यात यश आले आहे. सध्या रस्त्यावरील दरड हटविण्यात आली असून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणचा धोका अद्याप टळला नसून घाटात या ठिकाणी असलेली झाडे रस्त्यावर कोसळण्याची भीती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून गाडी चालवताना प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed