श्री तुळजाभवानी देवीजींचा शारदीय नवरात्र महोत्सव ०६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. श्री देविजींची मंचकी निद्रा ७ ते १४ ऑक्टोबर व २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत आहे. त्यामुळे या कालावधीत सिंहासन पूजा बंद राहतील. तसेच माहे ऑक्टोबर 2023 मधील इतर दिवशी सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील याची सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी, सेवेकरी व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे मंदिर संस्थानकडून सांगण्यात आले आहे.
भाविकांनी सिंहासन पूजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ http://shrituljabhavani.org वरुन सिंहासन पूजा पास बुकींग या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर http://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करुन भाविकांनी आपली सिंहासन पूजेची नोंदणी करावी आणि सिंहासन पूजा नोंदणीचा लाभ घ्यावा, असे श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
सिंहासन पूजा नोंदणी २६ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० पर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविण्यात येईल. भाविकांना प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने द्वितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविला जाणार आहे.
भाविकांना द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. प्रथम व द्वितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविण्यात येणार आहे.
भाविकांना तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. माहे सप्टेंबर २०२३ या महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता प्रसिध्द करण्यात येईल.