• Fri. Mar 6th, 2026
    तपासणीसाठी पोलिसांनी २ ट्रक घेतले बाजूला, उघडताच असं पाहिलं की अधिकारी हादरले…

    नाशिक : मध्यप्रदेशमधून शिरपूरकडे अवैधरित्या ट्रकमधून वाहतूक होणाऱ्या लाखो रुपयांच्या दारू साठ्यासह शिरपूर पोलिसांनी दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे मद्य तस्करी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

    शिरपूर पोलिसांना खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथून शिरपूर मार्गे धुळ्याकडे २ मालट्रक दारूने अवैधरित्या येत असून, शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या संदर्भात खात्री केली. यानंतर सापळा रचन्याच्या सूचना देण्यात आल्या. पथकाने शहादा फाट्याजवळ सापळा रचला असता या सापळ्या दरम्यान दोन मालट्रक माहिती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना आढळून आला.

    Electricity Theft : वीज बिल तपासताना मीटर पाहताच अधिकारी चक्रावले, अशी चोरी तुम्ही पाहिलीच नसेल…
    पोलिसांनी तात्काळ या दोन्ही मालट्रक थांबवून त्यात असलेल्या मालासंबंधित चालकास विचारणा केली. त्याने उडवा-उडवीचे उत्तरं दिल्यानंतर पोलिसांनी या ट्रकमधील सामानाची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी प्रकारचा मद्यसाठा पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी हे दोन्ही ट्रक ताब्यात घेतले असून या ट्रकमधून जवळपास ५५ लाख ३७ हजार २८० रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त केला आहे.

    नेमका हा दारूसाठा कोणाच्या मालकीचा होता व तो कुठल्या ठिकाणी चालला होता, याचा तपास शिरपूर पोलीस आता करीत आहे. या कारवाईदरम्यान शिरपूर पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    Maharashtra Rain Alert : राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे; मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed