• Sat. Sep 21st, 2024
गुड न्यूज; वाहतूककोंडी रोखण्यासाठी गणपती विसर्जनादिवशी विशेष बससेवा, वाचा सविस्तर…

पालघर : मिरा-भाईंदर महापालिकेडून गणेश विसर्जनादिवशी उत्तन भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी यंदाही विशेष बससेवा दिली जाणार आहे. भाईंदर पश्चिमेला घरगुती गणेश विसर्जनासाठी मांडली तलाव येथे, तर सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी भाईंदर खाडी येथे सुविधा आहे. येथील मार्ग अरुंद असल्याने विसर्जनाची मिरवणूक निघाल्यास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे भाईंदर ते उत्तन रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जातो.

या कालावधीत भाईंदर स्थानकातून उत्तन राई, मुर्धा व मोर्वा दिशेला जाणाऱ्या परिवहन बस पकडण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ चालत यावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी, मिरा रोड रेल्वे स्थानक ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व तेथून पुढे उत्तन या मार्गावर ही बस सेवा दिली जाणार आहे.

Women’s Reservation: ७५ वर्षांनी देशात समान संधीची पहाट, महिलांना ३३ टक्के आरक्षण, आज विधेयक संसदेत मांडणार
गेल्या महापालिका प्रशासनाने विसर्जनाचे पाच दिवस दुपारनंतर उत्तन भागात जाणाऱ्यांसाठी मिरा रोड रेल्वे स्थानकापासून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विशेष बससेवा दिली होती. यंदाही उत्तनवासींची गैरसोय टाळण्यासाठी विसर्जनाच्या कालावधीत विशेष बस सेवा देण्याचा निर्णय महापालिकेने सोमवारी घेतला आहे. या सेवेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
अवर्सेकरांवर CBIचे छापे, ३८४७ कोटींचं कर्ज बुडवल्याचा आरोप; ‘मातोश्री’ कनेक्शन समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed