• Mon. Nov 25th, 2024
    लई ‘बेस्ट’! सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी ‘बेस्ट’ रात्रभर धावणार, मुंबईकरांची सोय झाली

    मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्रभर बेस्टसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ मार्गांवर २७ अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत रात्रभर बस सेवा देण्याचे नियोजन केले होते. मात्र यंदा मुंबईतील गणेशभक्तांचा उत्साह पाहता १९ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. उत्तर पश्चिम मुंबईकडे गिरगाव, परळ, लालबाग, चेंबूरमार्गे प्रवर्तित होणार आहेत. या बस रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत सेवेत असतील.

    मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या सभागृहात मुंबई पोलिस, रेल्वे, बेस्ट, रेल्वे सुरक्षा बल यांसारख्या विविध प्राधिकरणांची बैठक घेतली होती. या बैठकीत, गणेशोत्सवकाळात मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली होती. या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाने नियोजन केले आहे. गणेशोत्सवकाळात पहिल्या पाच दिवसांत घरगुती गणपतीनिमित्त अनेक जण गावी जातात किंवा काहींच्या मुंबई महानगरातील घरीच गणपती येतो. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत मुंबईत रात्रभर बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त २० ते २८ जादा बसगाड्या या रात्रभर सेवा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच ते सहा विविध मार्गांवर या बस चालवण्यात येणार आहेत. या बसगाड्यांची सेवा २४ तास असेल.

    Ganeshotsav 2023: मुंबईत उत्सवरंग…परमानंद, गणरायाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज; घरोघरी चैतन्य
    बस क्र मार्ग

    ४ लि. डॉ. एम. इक्बाल चौक-ओशिवरा आगार

    ७ लि. विजयसिंह वल्लभ चौक (पायधुनी)-विक्रोळी आगार

    ८ लि. डॉ. एम. इक्बाल चौक-शिवाजी नगर टर्मिनस

    ए २१ डॉ. एस. पी. एम चौक-देवनार आगार

    ए ४२ पं. पळुस्कर चौक-सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक

    ४४ वरळी गाव-एस. वाय. चौक (काळाचौकी)

    ६६ सीएसएमटी-राणी लक्ष्मीबाई चौक

    ६९ डॉ. एस. पी. एम. चौक-पी. टी. उद्यान (शिवडी)

    सी-४० पी. टी. उद्यान (शिवडी)-दिंडोशी बस स्थानक
    Mumbai News: मुंबईकरांना रात्रभर बाप्पाचं दर्शन घेता येणार, बेस्टचा ‘लई बेस्ट’ निर्णय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *