• Sat. Sep 21st, 2024
Pune Crime: नशेत बायकोविषयी वाईट-साईट बोलला, जीवलग मित्रानेच दोस्ताचा काटा काढला; कसा घडला गुन्हा?

म.टा.प्रतिनिधी, पुणे : दारू पित असताना तरुणाने मित्राच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरली. त्याचा राग आल्याने मित्राने साथीदारासह तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. जखमी झालेल्या तरुणाला नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून महामार्गावर ढकलले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी कुटुंबीयांनी सहा महिन्यांनी तक्रार केली. वाकड पोलिसांनी तपास करून खुनाला वाचा फोडली. दिनेश दशरथ कांबळे (वय २६) असे खून झालेल्याचे नाव आहे. सिद्धांत रतन पाचपिंडे (२३, रा. गुरुनानक नगर कॉलनी, रहाटणी), प्रतीक रमेश सरवदे (वय २५, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी उपोषण, तरुणाचा संयम सुटला, गाईच्या गोठ्यात गेला अन्… नांदेड हादरलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कांबळे सहा महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची आई माया दशरथ कांबळे (५०, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी दिनेशच्या मित्रांकडे चौकशी केली. दिनेश १५ मार्च २०२३ रोजी रात्री काळेवाडी फाटा येथे मित्र सिद्धांत पाचपिंडे आणि प्रतीक सरवदे यांच्यासोबत दारू प्यायला बसला होता. त्या वेळी त्यांच्यात भांडण झाले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धांत आणि प्रतीक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

कसा घडला गुन्हा?

– सिद्धांत, प्रतीक आणि दिनेश हे तिघे १५ मार्चला दारू प्यायला बसले. त्या वेळी दिनेश याने प्रतीकच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरली.

– त्यातून त्यांची भांडणे झाली. प्रतीक आणि सिद्धांत यांनी दिनेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याला जखमी केले.

– त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले. मात्र, पोलिस चौकशी होईल, या भीतीने रुग्णालयाच्या ऐवजी ते कासारवाडीला गेले.

– नाशिक फाटा उड्डाणपुलावरून त्यांनी दिनेशला महामार्गावर फेकून दिले.

ओळख न पटल्याने अपघाताची नोंद

दिनेश कांबळे १६ मार्च २०२३ रोजी नाशिक फाटा येथे मृतावस्थेत आढळला. त्या वेळी त्याची ओळख पटली नाही. वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवून बेवारस मृतदेहाची भोसरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

आशिया चषक जिंकूनही भारत पाकिस्तानच्या मागेच, वनडे रँकिंगचा काय आहे नेमका गोंधळ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed