• Sat. Sep 21st, 2024

एकमेकांना आधार द्या, या गोष्टी कोणालाही परवडणार नाहीत; आपल्यात तशी पद्धत नाही-अजित पवार

एकमेकांना आधार द्या, या गोष्टी कोणालाही परवडणार नाहीत; आपल्यात तशी पद्धत नाही-अजित पवार

सातारा: जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्टवरून उसळलेल्या दंगलीच्या घटनेनंतर एका आठवड्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुसेसावळीला अचानक भेट दिली.तसेच येथील नुकसानीची पहाणी केली आणि गावातील लोकांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले.

आक्षेपार्ह पोस्टरवरून उसळलेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला होता तर १० जण जखमी झाले होते. या घटनेनंतर प्रशासनाने ७२ तास इंटरनेट सेवा बंद केली होती. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावाला अचानक भेट दिली. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. अजित पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील वातावरण चांगले राहण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना आधार द्यावा. या गोष्टी कोणालाही परवडणार नाहीत. आपल्यात तशी पद्धत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना, बारा बुलतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. तशाच पद्धतीने आपण पुढे गेले पाहिजे व तसेच वागले पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्रामस्थांना दिला.

मागील आठवड्यात रविवारी या गावात दंगल झाली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता,तर अकरा जण गंभीर जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी गावातील नुकसानीची पहाणी करून लोकांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, गावात कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी, पोलिस यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. गावातील वातावरण चांगले राहण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना आधार द्यावा. या गोष्टी कोणालाही परवडणार नाहीत.

काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळी येथील गावाला ग्रामस्थांची व मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच अचानक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट दिली.

कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातलाच, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय : अजित पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed