• Sat. Sep 21st, 2024

मुलाप्रमाणे जपलेल्या बैलाचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा; जड अंतकरणाने दिला निरोप

मुलाप्रमाणे जपलेल्या बैलाचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा; जड अंतकरणाने दिला निरोप

कोल्हापूर: माणसांपेक्षा जनावर बरी अशी एक म्हण आहे. वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहिलेले जनावर हे आपल्यासोबत तेवढेच प्रामाणिक असतात आणि प्रेम ही करत असतात. इतक्या वर्षात त्या जनावरांसोबत आपला लळा एवढा लागतो की तो आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातो. हे सांगायचे कारण म्हणजे कागल तालुक्यातील कुरणी येथील दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना. मुलाप्रमाणे जपलेल्या बैलाच वयोमानाने निधन झाले आणि कुटुंबासोबतच संपूर्ण गाव शोककळेत बुडाला… गावकऱ्यांनी जड अंतकरणाने या बैलाची टाळ मृदंगाच्या गजरात अंत्ययात्रा काढून बैलाला निरोप दिला.

खोंडाच बारसं करून सागर असं नाव ठेवल

कोल्हापुरातील कागल तालुक्यातील मुरगुड जवळील कुरणी या गावात राजाराम दादू पाटील हे शेतकरी राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे वसुधा नावाची गाय होती. या गायला त्यांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून सांभाळ केला आणि या वसुधेला दिवस गेले, यावेळी या कुटुंबाने तिचे डोहाळे जेवण केले आणि याच गाईच्या पोटी सुंदर अशा एका खोंडाणे जन्म घेतला. कुटुंबांनी त्या खोंडाच बारसे करून सागर असे नाव ठेवल. यावेळी ही पाटील कुटुंबाने संपूर्ण गावाला गाव जेवण घालून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सागर जसा मोठा होत गेला पाटील कुटुंबीयांसह गावकऱ्यांना लळा लावला. या सागर बैलाचा दरवर्षी मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा केला जायचा. यावेळी भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम ठेवले जायचे. सागर सगळ्यांचाच लाडका असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे काम करत असत तो संपूर्ण गावामध्ये दिवसभर मुक्तपणे फिरायचा गावकऱ्यासोबत बसायचा यामुळे शांत असणाऱ्या या सागर बैलाचे कौतुकच संपूर्ण गाव करत. देखना आणि रुबाबदार असा सागरचा बैलपोळा मधील मिरवणुकीमध्ये त्याचा रुबाब बघण्यासारखा असायचा.

टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये निरोप

कुटूंबातील सदस्याप्रमाणे राजाराम पाटील त्याचा सांभाळ करत असत मात्र त्याच वय झाल्याने दोन दिवसांपूर्वी १४ तारखेला त्याच निधन झाले आणि पाटील कुटुंबीयांसह संपूर्ण कुरणी गावच शोककळा पसरली. कोणाच्याही डोळ्यातून पाणी थांबेना. त्यानंतर पाटील कुटुंबीयांनी त्याची अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला यावेळी गावातील महिलांनी सागर बैलाची मृतदेह ठेवलेल्या ट्रॅक्टरला पाणी घातले पूजा केली आणि गावातील भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये सागर बैलाची अंत्ययात्रा काढून त्याला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

अंतरवालीत बैलाची पूजा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बैलपोळा साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed