• Mon. Nov 25th, 2024
    जरांगेंच्या उपोषणाची कोंडी फोडली, पण सरकारचं टेन्शन कमी होईना, २ समाज आंदोलनासाठी रस्त्यावर!

    अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र, नगर जिल्ह्यात सुरू असलेले धनगर आणि नाभिक समाजाचे उपोषण सुरूच आहे. धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे तर नाभिकांचे नगर शहरात उपोषण सुरू आहे. दोन्ही ठिकाणी राजकीय नेते आणि राज्यभरातून समाज बांधव भेटी देत असल्याने आंदोलन व्यापक होत आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका दोन्ही ठिकाणी घेतली गेल्याने जालन्यातील उपोषण मिटले, तरी नगरमधील ही दोन्ही उपोषणे सुरूच होती.

    संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, या मागणीसाठी सहा सप्टेंबरपारून यशवंत सेनेच्या वतीने चौंडीत उपोषण सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील स्मारकास्थळी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनास सर्वपक्षीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, वेळ पडली तर अहिल्यादेवींच्या जन्मभूमीत मरण पत्कारू, असे दोडतले आज म्हणाले.

    पूर्ण न होणारी आश्वासने दिली नाहीत ना…? राज ठाकरे यांनाही ‘ती’ भीती, लांबलचक पोस्ट लिहिली
    तर नाभिक समाजानेही ओबीसी ऐवजी अनुसूचित जाती (एस.सी.) मध्ये समावेशाच्या मागणीसाठी नगर शहरात उपोषण सुरू केले आहे. नाभिक समाजाच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. सलून दुकाने बंद ठेवून समाज बांधव यामध्ये सहभागी झाले. तर धनगर समाजानेही आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आज चौथा दिवस असून राज्यभरातील हजारो नाभिक समाजातील नागरिकांनी येथे येऊन पाठिंबा दर्शविला.

    जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं पण कुटुंबीय मागे हटेना, सरकारला इशारा देत लढण्याचा इरादा कायम!
    यावेळी नाभिक समाजाचे प्रदेश सहसरचिटणीस सयाजीराव झुंजार म्हणाले, “केंद्र सरकारने अभ्यास करून नाभिक समाजाला एस.सी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची शिफारस केली. मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत लागू केले नाही. देशातील चार राज्यांमध्ये आरक्षण लागू झाले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. आरक्षण मिळाले नाही तर समाजामध्ये वाईट परिस्थिती निर्माण होईल आम्हाला एस. सी. प्रवर्गामध्ये जायचे आहे. आमचा तो अधिकार आहे तो मिळवण्यासाठी आम्ही मोठा लढा उभा करणार आहोत. केंद्र सरकार समान नागरी कायदा आणत असून तो आपल्यासारख्यांना त्रासदायक आहे. याला आपला विरोध असणार आहे. या माध्यमातून आपल्या अधिकारांवर गंडांतर येणार आहे”.

    लाठीचार्ज करणाऱ्यांचं निलंबन, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतो, आरक्षणही देतो; मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना शब्द
    “आजच्या युवकांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहेत. मुख्य विषयापासून विचलित करून तरुणांची माथी भडकवली जात आहे. मुस्लिम समाज हा आपल्या सर्व सुख दुःख बरोबर असतो, आम्ही आता ओबीसीमध्ये आहोत पण आमचा शेवटचा नंबर आहे. देवाने माणसे घडवली त्यांना सुंदर करण्याचे काम नाभिक समाज करत असतो आम्ही दहा दिवस राज्यभरातील दुकाने बंद ठेवली तर काय होऊ शकते, हे तुम्हाला दिसेलच. आमच्या पुढच्या पिढीचे नुकसान होऊ देणार नाही. यासाठी मोठा लढा उभारू. आता हा लढा नगर शहरातून उभारला असून राज्यभर आंदोलने सुरू होतील”, असेही झुंजार म्हणाले.

    खिशातून काढत चिठ्ठी दिली, मध्यरात्री चर्चा केली; रावसाहेब दानवे-गिरीश महाजनांनी घेतली जरांगे पाटलांची भेट!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed