पुढच्या ३-४ तासांमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, नांदेड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही तास या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्या आणि खबरदारी घ्यावी असाच अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान ३-४ तासांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकाणी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वादळीवाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुढचे ४ तास नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी हवामानाचा अंदाज घ्यावा असाही इशारा देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांनीही हवामानाच्या अंदाजानुसार शेतीच्या कामांना सुरुवात करावी अशी माहिती आहे.
पुढच्या ३-४ तासांमध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल. खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती. पण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीय वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभर पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.