• Sat. Sep 21st, 2024
बॉम्बे डाइंगकडून वरळी येथील जमिनीच्या विक्रीला मंजुरी

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई

बॉम्बे डाइंग अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या संचालक मंडळाने वरळी येथील २२ एकराचा भूखंड ५२०० कोटी रुपयांना विक्रीला बुधवार, १३ सप्टेंबरला मंजुरी दिली. मूळ जपानच्या सुमितोमो रिअॅल्टी या समुहाच्या गोइसू रिअल्टी या उप कंपनीला हा भूखंड विक्री होणार आहे. त्या माध्यमातून कंपनी ४३०० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविणार असून तो करपूर्व नफा असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात कंपनीला गोईसू रिअल्टीकडून ४६७५ कोटी व दुसऱ्या टप्प्यात ५२५ कोटी रुपये मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रक्कम काही आवश्यक तरतुदी व करारानंतर प्राप्त होणार आहे. या व्यवहारामुळे कंपनीचे नक्त मूल्य सकारात्मक होईल. त्याआधारे भविष्यात लाभांश वितरित केला जाईल. तसेच भविष्यातील स्थावर मालमत्तेसंबंधीच्या प्रकल्पांसाठी मुबलक निधी उपलब्ध होऊ शकेल, असे कंपनीने म्हटले आहे. ‘या व्यवहाराला संचालक मंडळाची मंजुरी मिळणे आनंदाचा क्षण आहे‘, अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष नस्ली वाडिया यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed