• Sat. Sep 21st, 2024

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर आला आहे. यंदा गणपतीचं आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. दरवर्षी कोकणातून नोकरीसाठी आलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी परत जात असतात. गणेशोत्सव साजरा करुन तो परत मुंबईत कामासाठी परत असतो. यावेळी चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष नियोजन करण्यात आलं आहे. रेल्वेद्वारे विशेष फेऱ्यांचं आयोजन गणेशोत्सवासाठी करण्यात आलं आहे. त्यामुळं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेनं आज ट्विट करुन आणखी एका निर्णयाची माहिती दिली आहे.

गणेशोत्सव काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या तीन गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तीन गाड्यांचे एकूण १६ डबे वाढवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मंगळुरु,एलटीटी ते कुडाळ आणि दिवा-चिपळूण मेमूच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

कधीपासून निर्णय लागू होणार?

एलटीटी मंगळुरु अप आणि डाऊन च्या एकूण १६ फेऱ्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. या एक्स्प्रेसच्या डाऊन गाडीला दोन शयनयान म्हणजेच स्लीपर कोचचे डबे वाढवले जाणार आहेत. मंगळुरु-एलटीटी एक्स्प्रेसला देखील दोन स्लीपर कोच वाढवले जाणार आहेत.

एलटीटी कुडाळ आणि कुडाळ एलटीटी या गाड्यांना देखील दोन दोन स्लीपर कोच वाढवले जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. याची अंमलबजावणी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान होईल. या गाडीच्या अप आणि डाऊन मिळून २४ फेऱ्या होतील.

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड; सचिनला मागे टाकले, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

दिवा चिपळूण आणि चिपळूण दिवा मेमू स्पेशल गाडीला ८ डबे होते. त्या डब्यांची संख्या वाढवून १२ करण्यात आली आहे. दिवा चिपळूण मेमू १३ सप्टेंबर ते १९सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यानं धावेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होतील. तर चिपळूण ते दिवा मेमूच्या १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान १८ फेऱ्या होतील.

शतक… द्विशतक आणि धावांचा पाऊस, विराट-राहुलने पाकिस्तानची धुलाई करत धावांचा डोंगर

गणेश उत्सव विशेष फेऱ्या-

मध्य रेल्वे द्वारे ३ डाऊन+३ अप गाड्यांमध्ये एकूण १६ डब्बे (८ डाऊन+८ अप) वाढवण्यात येत आहेत.

१)०११६५/६६ एलटीटी-मंगळूरु
अगोदर-२०
आता-२२
२ शयनयान वाढ

२)०११६७/६८ एलटीटी-कुडाळ
अगोदर-२०
आता-२२
२ शयनयान वाढ

३)०११५५/५६ दिवा-चिपळूण
अगोदर-८
आता-१२
४ मेमू डब्बे वाढ
एक वादा राहुल दादा… दमदार कमबॅक करत K L Rahul चा शतकासह विक्रम, बीसीसीआयने कौतुक करत…

डोक्यावर पाऊस, हलगीचा कडकडाट, कार्यकर्त्यांच्या उत्साहात कोल्हापुरात काँग्रेसची जनसंवाद यात्रा जोमात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed