चंद्रशेखर शेळके (रा. कामठी, वर्धा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित २५ वर्षीय तरुणीचे काही महिन्यांपूर्वी चंद्रशेखरशी प्रेम जुळले. चंद्रशेखरने तिला लग्नाचे आमिष दाखविले. पीडित तरुणीचा विश्वास संपादन केल्यावर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. ही बाब तिने चंद्रशेखरला सांगून त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र, तो टाळाटाळ करू लागला.
दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिला प्रसूतीकळा सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. ३० ऑगस्ट रोजी प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. रुग्णालयातून सुट्टी होताच तिने बाळासह चंद्रशेखरची भेट घेतली. आता तरी लग्न कर, अशी गळ तिने त्याला घातली. पण, त्यानंतरही त्याने लग्न करण्यास व बाळाचे पितृत्व स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने तिवसा ठाणे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चंद्रशेखरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, घटनास्थळ वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सदर गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला आहे.