युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी ही कलाकृती साकारली आहे. रांध्याच्या पर्यावरणपूरक मटेरीअलपासून ही मूर्ती साकारण्यात आली असून जर्मनीतील संस्थेचे प्रतिनिधी अद्वैत खरे यांच्याकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, गणेश रामलिंग, कोषाध्यक्ष नितीन पंडित, स्वप्नाली पंडित, शिल्पकार विवेक खटावकर, सागर पेद्दी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र मंडळ म्युनिकला गणेशोत्सवासाठी श्रीगणेशाची मूर्ती देणे आणि महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वार्षिक गणेशोत्सवामध्ये मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना आणि पूजा करणे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत देणे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या “मायमराठी” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वह्या/पुस्तके आणि म्युनिकमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आर्थिक किंवा अन्य सहाय्य करणे. तसेच म्युनिकच्या पालवी दिवाळी अंकाला आर्थिक / मुद्रणासाठी सहाय्य करण्याचे संस्था आणि तुळशीबाग मंडळामध्ये निश्चित झाले आहे.