गुन्हेशाखा पोलिस आज, रविवारी पुन्हा त्याची चौकशी करणार आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोंटूला दुबईला पळून जाण्यासाठी नागपुरातील बुकी बिंदू, रामदासपेठेतील बुकी व एका सॉफ्टवेअर डेव्हलपरने मदत केली. प्रकरण शांत करण्याचे आश्वासनही त्याला दिले होते. शुक्रवारी झालेल्या चौकशीदरम्यान या तिघांबाबतही पोलिसांनी सोंटू याच्याकडून माहिती घेतली नाही.
सोंटूची कसून चौकशी केल्यास नागपुरातील अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकला. पोलिसांनी १७ कोटींची रोख,१४ किलो सोने व २९४ किलो चांदी तसेच त्याच्या लॉकरमधून ८५ लाखांची रोख व साडेचार कोटींचे दागिने जप्त केले होते.