• Mon. Nov 25th, 2024
    मृत्यूनंतरही वेदनांचे काटे टोचतात! स्मशानभूमीत नेलेला मृतदेह पुन्हा घरी आणला; नेमकं प्रकरण काय?

    चंद्रपूर: स्मशानभूमीच्या वादातून अंत्यसंस्कारास विरोध केल्याने वृद्ध महिलेचा मृतदेह घरी परत घेऊन जाण्याची दुदैवी वेळ ओढवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. या घटनेने जिल्हा हादरला आहे. ही घटना कोरपणा तालुक्यात येणाऱ्या नवेगाव येथे घडली. सरस्वती लक्ष्मण कातकर (८५) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले.
    मृत्यूनंतर ही यातना संपेनात! नदी किनारी अंत्यसंस्कारासाठी रचली चिता; अग्नी देताच पुराच्या प्रवाहात…
    आपल्या देशाचे चांद्रयान चंद्रावर जाऊन पोहोचले. मात्र याच देशातील एका गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने मृतदेहाला ही वेदना भोगाव्या लागल्या ही मोठीच शोकांतिका. मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव येथील सरस्वती लक्ष्मण कातकर (८५) या वृद्ध महिलेचा गुरूवारी आजाराने मृत्यू झाला होता. नवेगाव गावाला हक्काची स्मशानभूमीची जागा नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाबाहेरील शेतात मृतदेह नेण्यात आले. ती जागा शासनाची आहे. मात्र त्या जागेवर एका शेतकऱ्याने अतिक्रम केल्याच्या आरोप गावकरी करतात.

    मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; जीआरमध्ये एक-दोन शब्दांची दुरुस्ती हवी, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय

    त्या शेतकऱ्याने आपल्या जागेवर अंतिमसंस्कार करण्यासाठी मनाई केली. त्यामुळे मृतदेह बराच वेळ रस्त्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर स्मशान भूमीत नेलेला मृतदेह परत घरी आणला गेला. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. महसूल विभागाला घटनेची माहिती करतात महसूल विभाग, पोलीस विभागाने घटनास्थळ गाठले. काल रात्रभर पोलीस गावात होते. शेवटी आज (शनिवार) गावातील सरपंचाच्या मध्यस्थीने शेतकरी आणि कुटुंबाची समजूत काढण्यात आली.शेवटी त्याच अतिक्रम असलेल्या शेतात अंतिमसंस्कार करण्याचे ठरले. महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज अंतिमसंस्कार करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *