अशीच एक घटना वाशी परिसरामध्ये घडली आहे. वाशीमध्ये शाळेत जाणाऱ्या एका मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्ती विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. छेड काढणारा २५ वर्षाचा आहे. वाशीमध्ये शाळकरी मुलींची छेड काढल्यामुळे एका केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानाला वाशी पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. ह्या आरोपीचे नाव सूरज कुमार जगत राम असे असून तो मूळचा काश्मीर येथील रहिवासी आहे. मात्र नोकरी निमित्त तो शहरी भागात आला होता.
तसेच हा २५ वर्षीय आरोपी मुंबईत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शिपाई म्हणून काम करत होता. मात्र ह्या आरोपींने अनेक शाळकरी मुलींची छेड काढल्याचे समोर आले आहे. तसेच तो मागच्या आठवड्यात एका शाळकरी मुलीची छेड काढून निघून गेला होता. एका अज्ञात व्यक्तीने छेड काढल्याप्रकरणी पीडित मुलीने तिच्या घरी तक्रार केली होती. त्यानंतर ही पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसोबत मार्केटमध्ये गेली होती. त्यावेळी ह्या पीडित मुलीला हा छेड काढणारा व्यक्ती दिसताच तिने ताबडतोब आपल्या आई वडिलांना सांगितले. मात्र हा आरोपी तात्काळ पळ काढण्याचा प्रयत्न करताच पीडितीच्या वडिलांनी आणि बाजारातील काही व्यक्तींनी ह्या आरोपीला पकडून वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पीडित मुलीची विचारपूस करून माहिती पटल्यावर ह्या आरोपीच्या विरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराचा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ह्या आरोपीने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मुलीची छेड काढल्याचे समोर आले असल्याचे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले. शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या २५ वर्षीय इसमास वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून ह्या आरोपीवर काय कारवाई करणार याकडे पीडित मुलीसह इतरही मुलींचे लक्ष लागले आहे.