• Sat. Sep 21st, 2024
ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन शाळकरी मुलगा ठाकरेंच्या भेटीला, उद्धव भावूकपणे म्हणाले….

अहमदनगर : राज्यात पावसाने दडी मारली आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. राज्यातल्या विविध भागांत जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. पावसाअभावी राज्यात दृष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पीकं करपू लागल्याने त्यांचा धीर खचला आहे. अशातच खचलेल्या शेतकऱ्यांच्या मनाला धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. काकडी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर असताना एका शाळकरी मुलाने उद्धव ठाकरेंना ठेचा-भाकरी असलेली शिदोरी दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलाची आस्थेने चौकशी करून हीच माझी आशीर्वादाची शिदोरी म्हणत मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरे यांनी अहमदनगरच्या कोपरगावामधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुबार पेरणी करूनही पिकं उगवली नाहीयेत. बियाणे-खतांचा खर्च वाया गेलेला आहे. सप्टेंबर उजाडला तरी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच लागणार नाही. अशी सगळी परिस्थिती असताना सत्ताधारी ‘शासन आपल्या दारी’ नावाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुणी वाली उरलाय की नाही, अशी परिस्थिती आहे. पण शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. वेडंवाकडं पाऊल उचलू नये. मी फक्त आपल्याला आश्वासन द्यायला आलो नाही. मुंबईत जाऊन या सगळ्याचा मी पाठपुरावा करेन. शक्य तेवढी मदत मी आपल्याला मिळवून देईल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी खचलेल्या शेतकऱ्यांना दिला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील आंदोलन: शासनाने GR काढला, कोणत्या मराठ्यांना दाखले मिळणार? GR मध्ये काय लिहिलंय? वाचा…
दरम्यान, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असताना कोपरगावमधल्या एका गावातील शाळकरी मुलगा कार्तिक वरपे याने त्यांना भाकरी-ठेचा-कांद्याची शिदोरी दिली. शाळेला दांडी मारून तुमच्यासाठी कार्तिकने शिदोरी आणल्याचं उपस्थितांपैकी एकाने सांगितलं. यावेळी ठाकरेंनी कार्तिकची आस्थेने विचारपूस केली. मला शिदोरी देतो आहेस पण तू खाल्लं का? आधी तू खा… असं उद्धव म्हणाले. त्यावर मी जेवलोय, आपणासाठी ही शिदोरी आणल्याचं कार्तिकने सांगितल्यावर ठाकरे भावुक झाले. हीच माझ्या आशीर्वादाची शिदोरी असल्याचं ठाकरे म्हणाले.

आमच्या जमिनीवर उभं राहून आमची भेट सुद्धा घेत नाहीत, दुष्काळी दौऱ्यात शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed