• Sat. Sep 21st, 2024
आमचे आरक्षण मराठा समाजाला नको, कुणबी समाजाचा हुंकार, आक्रमक भूमिका, सरकारला इशारा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याने आता कुणबी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका कुणबी समाजाने घेतली आहे. या मागणीसाठी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले जाईल व प्रसंगी आक्रमक आंदोलनही उभारले जाईल, असा इशारा अखिल कुणबी समाजाने दिला आहे.

जालना येथे मरोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. सरकारने आज त्यासाठीचा शासन आदेशसुद्धा काढला. आता कुणबी समाजाने याला विरोध दर्शविला आहे. आज माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे, काँग्रेसचे नरेंद्र जिचकार आणि अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली. यात कुणबी समाजातील सर्वच उपजातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील आंदोलन: शासनाने GR काढला, कोणत्या मराठ्यांना दाखले मिळणार? GR मध्ये काय लिहिलंय? वाचा…
याबाबत शहाणे म्हणाले, ‘मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. महाराष्ट्र बंद पुकारला जाईल. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या आशयाचे निवेदनसुद्धा दिले आहे.’ तसेच लेकुरवाळे म्हणाल्या, ‘मराठा समजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. मात्र, त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाऊ नये. आधीच ओबीसी कोट्यात अनेक जाती आहेत. त्यात मराठा जातीचाही समावेश करणे तर्कशुद्ध नाही. सरकारने त्यांना वेगळे आरक्षण द्यावे, त्याचे आम्ही स्वागत करू. मात्र, ओबीसी कोट्यातून दिल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल.’

सरकार म्हणतंय समिती अभ्यास करेल, जरांगे म्हणतात, आता अभ्यास नको थेट GR काढा, आमच्याकडे या, पुरावे घेऊन जा!
उद्यापासून उपोषण

कुणबी समाजाची पुढील दीशा काय असावी हे ठरविण्यासाठी शुक्रवारी समाजाची बैठक बोलाविण्यात आली आहे. शनिवारपासून संघटनेच्या जुनी शुक्रवारी परिसरातील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले जाईल, असे शहाणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed