महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दरपत्रक ठरवून दिले आहेत. कोणत्याही खासगी बस वाहतूकदाराने या दराच्या ५० टक्के अधिक (दीडपट) आकारणी करण्यास परवानगी असून, या दराच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२-२२५४४४ या व्हॉटसॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
प्रवासाचा मार्ग रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे तिकीट– साधे ५२५ रुपये, शिवशाही (वातानुकुलित) ८१५ रुपये, शयनयान (विना वातानुकुलित) ७१० रुपये. रत्नागिरी ते ठाणे – ५०५ रुपये, ७५० रुपये, ६९० रुपये. रत्नागिरी ते बोरीवली – ५५० रुपये, ८१५ रुपये, ७५० रुपये. रत्नागिरी ते पुणे/पिंपरी – ४९० रुपये, ७२५ रुपये, ६६५ रुपये. चिपळूण ते मुंबई – ३९० रुपये, ५८५ रुपये, ५३५ रुपये. चिपळूण ते पुणे – ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५ रुपये. दापोली ते मुंबई – ३५० रुपये, ५२० रुपये, ४७५ रुपये. दापोली ते ठाणे – ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५रुपये. दापोली ते बोरोवली – ३७५ रुपये, ५५५ रुपये, ५१० रुपये आणि दापोली ते पुणे/पिंपरी – ३५० रुपये, ५२० रुपये, ५७५ रुपये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे व दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.