• Mon. Nov 25th, 2024

    अश्लील इशाऱ्यांनी पुणे सातारा हायवेवर वाहन चालकांचं लक्ष विचलित करतायत महिला, काय आहे कारण?

    अश्लील इशाऱ्यांनी पुणे सातारा हायवेवर वाहन चालकांचं लक्ष विचलित करतायत महिला, काय आहे कारण?

    पुणे : पुणे-सातारा माहमार्ग हा सतत अपघातांमुळे चर्चेत असतो. मात्र आता हा माहामर्ग एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. पुणे – सातारा महामार्गावर असणाऱ्या खेड शिवापूर परिसरात काही महिला रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना हातवारे करून चुकीचे काम करत असल्याचे समोर आले आहे.

    या संदर्भात नागरिकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास देखील आणून दिली आहे. त्यावर आता खेड शिवापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना देखील ताब्यात घेतले आहे. कसून चौकशी केली जात असून त्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असावा अशी शंका पोलिसांना आहे.

    तोतया लष्करी अधिकाऱ्याला पुणे स्टेशनवर बेड्या, मोदींच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर लावलेली हजेरी
    पुणे सातारा महामार्गावरील वेळू गावाच्या हद्दीत तेथील सेवा रस्त्यावर उभं राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हातवारे, अश्लील इशारे करून त्यांना त्रास देण्याचे काम करत होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार या भागात सुरू होता.

    छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसची धडक, सुप्रसिद्ध साहित्यिकाच्या मृत्यूने हळहळ
    खेड शिवापूर पोलिसांनी यावर आता पाळत ठेवत कारवाई केली आहे. या महिलांनी जाणाऱ्या लोकांना वेश्या गमनास प्रवृत्त करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्या महिलांवरती कारवाई करण्यात आली आहे. खेड शिवापूरच्या राजगड पोलिस स्टेशनमध्ये तिघा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

    मामाकडे जाताना ट्रकने फरफटत नेलं, ‘स्वाभिमानी’च्या विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्याचा मृत्यू
    खेड शिवापूर पोलिसांकडून महामर्गाशेजारी असणाऱ्या सर्व लॉजिंगची आता कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पोलिसांनी छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे. या महिलांसोबत आणखी काही व्यक्ती असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    जळगावात पत्रकार संदीप महाजन यांना भर रस्त्यात बेदम मारहाण, शिंदे गटाच्या आमदारांनी दिली होती धमकी

    या संदर्भात लवकरच पोलिसांकडून माहिती उजेडात आणण्यात येणार आहे. मात्र या महिलांच्या अशा कृत्यामुळे पुणे – सातारा माहामार्ग वेगळ्याच विषयांने चर्चेत आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed