• Mon. Nov 25th, 2024

    दसरा मेळाव्यासाठी शेकडो एसटी बस, ८०० जणांकडून १० कोटी खर्च, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

    दसरा मेळाव्यासाठी शेकडो एसटी बस, ८०० जणांकडून १० कोटी खर्च, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

    मुंबई: गेल्यावर्षी मुंबईत झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या खर्चावरुन उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मुंबईत शेकडो एसटी बस आल्या होत्या. यासाठी तब्बल ८०० जणांनी एसटी महामंडळाकडे १० कोटी रुपयांची रक्कम जमा केली होती, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.

    लाठीमारामुळे अजितदादा नाराज, सरकारी कार्यक्रमांना दोन दिवस गैरहजर, आज मराठा आरक्षणाच्या बैठकीला हजेरी

    शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा वापरुन डिवचले जाते. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठीही प्रचंड पैसा खर्च झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरुन चांगलेच रान उठवले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ऑक्टोबर २०२२ मध्ये बीकेसी येथे झालेल्या दसरा मेळाव्यासाठी एसटी महामंडळाला १० कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे वेगवेगळ्या ८०० लोकांकडून आले होते. त्यानुसार एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आले होते. मुंबईत पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन दसरा मेळावे झाले होते. या दोन्ही मेळाव्यांसाठी मिळून राज्यभरातून एकूण १८०० एसटी बसेस मुंबईत आल्या होत्या.

    शासन आपल्या दारीमध्ये पहिल्यांदा असं घडलं,बुलढाण्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी, कारण समोर …

    शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खर्चाचा मुद्दा उपस्थित केला होता. एसटी बसेस आणि जेवणाऱ्या व्यवस्थेसाठी शिंदे गटाने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे काँग्रेसने म्हटले होते. हे पैसे कुठून आले, याची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी करण्याची मागणीही काँग्रेसने केली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, एसटी महामंडळा देण्यात आलेले पैसे मुंबईतील डेपो व्यवस्थापकाकडे जमा करण्यात आले होते. वेगवेगळ्या लोकांनी मिळून एसटी महामंडळाकडे ९.९ कोटी रुपये जमा केले होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    मला खुर्चीवरून उतरवण्याचा प्रयत्न, कोणी बाल बाका करू शकत नाही ; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed