• Mon. Sep 21st, 2026
रक्षाबंधनासाठी नणंदेकडे आली; पतीसोबत वाद, पत्नीचा टोकाचा निर्णय अन् पोटच्या लेकराचा नाहक बळी

ठाणे: डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील अजडेपाडा परिसरात ही घटना घडली. पूजा सोळंके असं महिलेचे नाव आहे. महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारून जीवन संपवलं आहे.
ऐकावे ते नवलचं! काकाचे पुतण्याच्या प्रेयसीसोबत लग्न; तरुण चक्क काकूलाच घेऊन पळाला, नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथे राहणाऱ्या पूजा रक्षाबंधनासाठी मुक्ताईनगरहून आपल्या पतीसोबत डोंबिवलीला आपल्या नणंदेकडे आली होती. नंदेच्या घरी राहत असताना पतीसोबत काही कारणावरुन वाद झाला. या वादानंतर महिलेने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मुक्ताईनगर येथे पूजा सोळंके ही आपल्या पतीसह राहते. आठ महिन्यापूर्वी तिचे लग्न झाले होते. पूजा रक्षाबंधनानिमित्त नणंदेकडे आली होती.

दरम्यान तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या पूजाने इमारतीच्या चौथा मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या सांगण्यानुसार, सकाळच्या सुमारास पूजा कोणत्यातरी व्यक्तीशी इंस्टाग्रामवर चॅटिंग करत होती. यावरून पती करण याने रागातून तिला जाब विचारला. याच मुद्यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यांच्या वादानंतर रागावलेल्या प्रियांकाने तिच्या वर्षभराच्या लेकासह फ्लॅटच्या बाल्कनीतून थेट खाली उडी मारली. मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

सरकार फक्त कागदोपत्री घोषणा करतं; पावसाच्या दांडीने शेतकऱ्यांचे बेहाल

काहीतरी जोरात, धपकन पडल्याचा आवाज ऐकून बिल्डींगमधील रहिवासी तेथे गोळा झाले आणि समोरील दृश्य पाहून ते हादरलेच. प्रियांका आणि तिचा छोटा लेक खाली रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी उपचारांसाठी तातडीने त्या दोघांना नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्या दोघांचेही मृदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इमारतीतील मजल्यांची संख्या आणि पीडित महिला कोणत्या मजल्यावर राहते हे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed