पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणाने वादात पत्नीचा जीव घेतला. यानंतर स्वत:वर ब्लेडने वार करत दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : पुणे जिल्ह्यातील देहूगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून तिची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी पतीने आधी स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार केले आणि त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत महिलेचे नाव शुभांगी आकाश बारसकर (वय 28 वर्षे) असे आहे. तर आरोपी पतीचे नाव आकाश रामदास बारसकर (वय 31 वर्षे) असे आहे. आकाश हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाघा गावचा रहिवासी आहे. तो आयटी इंजिनिअर असून, पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. सध्या तो देहूगावमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 20 सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान देहूगावातील रामचंद्र यदु राऊत यांच्या भाड्याच्या खोलीत ही घटना घडली.
आकाशने काही महिन्यांपूर्वी गावात शेतीची जमीन खरेदी केली होती. मात्र, पत्नी शुभांगीचा या जमिनीला विरोध होता. जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांवरूनही दोघांमध्ये वाद होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शुभांगीला पुण्यातच प्रॉपर्टी खरेदी करायची होती, तर आकाशने गावात जमीन घेतल्याने दोघांमध्ये मतभेद वाढले होते.
घटनेच्या दिवशी पहाटे याच मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आकाशने धारदार हत्याराने शुभांगीच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्याने शुभांगीचा मृत्यू झाला.
आकाशचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न
पत्नीची हत्या केल्यानंतर आकाशने स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार केले. त्यानंतर त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून तो गंभीर जखमी झाला आहे.
शुभांगीच्या वडिलांकडून तक्रार
घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुभांगीचे वडील सतीश मारुती काईत (वय 56 वर्षे) यांच्या तक्रारीवरून आकाश रामदास बारसकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेले धारदार हत्यार, तसेच इतर पुरावे ताब्यात घेतले असून, पती-पत्नीमधील वाद आणि हत्येमागील नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया काय?
देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले की, “काल सकाळी आकाश बारसकर नावाचा व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासात आकाशने आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार केले आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
“सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी आकाशने गावात जमीन खरेदी केली होती. त्याला त्याच्या पत्नीचा विरोध होता. पत्नीला पुण्यातच प्रॉपर्टी खरेदी करायची होती. याच कारणावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होते. आकाश हा आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होता”, अशी माहिती त्यांनी दिली.
Rain Update : ठाण्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, नेमका अंदाज काय?
आरोपीवर उपचार सुरु
सध्या आरोपी आकाशवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची वैद्यकीय स्थिती पाहून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या आणि त्यानंतर पतीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न यामुळे देहूगाव परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा