ठाणे : राज्यात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलं आहे. मुंबईत पावसाच्या काही सरी बरसल्या. तर ठाण्यात जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे राज्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. ठाण्यातही गणेशोत्सवामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. असं असताना अचानक पाऊस आल्याने नागरिकांचा मोठा हिरमोड झाला. फक्त ठाणे शहर नाही तर कल्याण आणि डोंबिवली शहरांतही चांगलाच मुसळधार पाऊस पडला.
कल्याण, डोंबिवली शहरांत गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित पाऊस पडताना दिसत नाही. कधी ढगाळ वातावरण, कधी ऊन ते कधी हलका पाऊस पडत होता. पण आज पावसाने चांगलीच बॅटिंग केली. दुपारी 3 नंतर शहरात मुसळधार पाऊस पडला. जवळपास तासभर ते दीड तास मुसळधार पाऊस पडल्यानंतर रात्री आठवाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरुच आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे 22 सप्टेंबरसाठी राज्यातील 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
Miraj Civil Hospital : पोलीस जेव्हा देव बनतात, मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर संकट कोसळलं, नेमकं काय घडलं?हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी 22 सप्टेंबरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या 48 तासात हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होणार आहे. त्याचा परिणाम वातावरणात होणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 24 सप्टेंबरला ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 23 आणि 24 सप्टेंबरला आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पाऊस येतो का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
पंजाबराव डख यांचा अंदाज काय?
दरम्यान, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड, जालना, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये 24 सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस पडेल. दररोज भाग बदलून पाऊस पडेल. हा निर्णायक पाऊस असणार आहे. या भागांमध्ये चार दिवसांत चांगला पाऊस पडणार आहे. हा पाऊस 24 सप्टेंबरपर्यंत आहे. यानंतर 2 ते 4 ऑक्टोबर या काळात या भागांमध्ये चांगला पाऊस पडेल. तसेच पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.
यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये 24 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर चांगला राहणार आहे. तसेच 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान येणाऱ्या पावसाचा जोर देखील याच भागात जास्त राहणार आहे, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली.
Central Railway : याला म्हणतात उत्पन्न! तिकीटांमधून नाही तर जाहिरात आणि इतर पर्यायी माध्यमांमधून मध्य रेल्वेने कमावले तब्बल 58.15 कोटी रुपयेसगळ्यात जास्त जोर जिथे अद्यापही पाऊस पडला नाही तिथे पाऊस पडणार आहे. या पावसात विजांचा कडकडाट जास्त राहील, अशीदेखील माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या बाजूचे राज्य तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे. 21 ते 23 सप्टेंबर कोल्हापूर पासून ते पालघर, पुणे, मुंबई, नाशिक, संगमनेर, अकोले, अहिल्यानगर या भागांमध्ये पाऊस असणार आहे, असं पंजाबराव डख म्हणाले आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा