• Mon. Sep 21st, 2026

Satara Politics : ‘सह्याद्रीचे वाघ मुक्तपणे फिरतात, कोणी अंगावर येईल तेव्हा बघून घेऊ’; शरद पवारांच्या शिलेदाराचे भाजप आमदारांना थेट आव्हान

सह्याद्री साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत राडा झाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजप आमदारांना थेट आव्हान दिलं आहे. आपल्यावर आरोप करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार तुमचे आहे. लावा चौकशी, असं म्हणत बाळासाहेब पाटील यांनी भाजप आमदारांना आव्हान दिलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष, माजी सहकार मंत्री आणि सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात बोलताना कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या दोन्ही आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. ‘मुक्तपणे फिरणाऱ्या सह्याद्रीच्या वाघांना कशाची भीती? कोणी अंगावर येईल तेव्हा बघू’, अशा शब्दांत बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या दोन्ही आमदारांना थेट आव्हान दिले.

माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक भाषण केलं. “सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरं व्हायची. पूर्वी तीन-तीन तास सभा चालायची. मात्र, यंदा काही लोकांना कारखान्याची सभा सुरळीत होऊ द्यायची नव्हती. डोळे काढेन, हात काढेन, अशी प्रक्षोभक भाषणं केली. आपण एका मर्यादेपर्यंत संयम ठेवला. अंगावर आल्यावर आपण बघूच. कारण, तुम्ही सर्व सह्याद्रीचे वाघ आहात. तुम्हाला कशाची भीती. तुम्ही मुक्तपणे फिरता. योग्य वेळी मी त्यांना उत्तर देईन”, असा सूचक इशारा बाळासाहेब पाटील यांनी भाजपा आमदारांना दिला.

Maharashtra TimesPandharpur News : उतारवयात प्रेम जडलं, वृद्धेने वादातून प्रियकराला संपवलं, दीड महिन्यांनी घटनेचा उलगडा

बाळासाहेब पाटील काय म्हणाले?

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. “आपण संयम ठेवला पाहिजे. आपल्याला संस्था चालवायची आहे. पुढे जायचे आहे”, असा कार्यकर्त्यांना सल्ला देऊन बाळासाहेब पाटील म्हणाले की, “यंदा सह्याद्री कारखाना पूर्ण क्षमतेने चालविणार आहोत. प्रतिदिन 11 हजार टनापेक्षाही अधिक गळीत आपण करणार आहोत. कारखान्याची यंत्रणा सक्षम झाल्यामुळेच विरोधकांना असुया निर्माण झाली असावी, अशी मला शंका आहे.”

Maharashtra TimesRain Update : ठाण्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, नेमका अंदाज काय?

बाळासाहेब पाटील यांचे आरोप

“माजी मंत्री संपतराव देशमुख, अनिल बाबर, माजी आमदार मोहनराव कदम हे देखील कारखान्याचे सभासद होते. ते वार्षिक सभेत व्यासपीठावर येऊन बसायचे. दिवंगत लालासाहेब यादव, आनंदराव जाधव, विठ्ठलतात्या जाधव, राजाभाऊ देशपांडे यांच्यासारखे ज्येष्ठ सभासद वार्षिक सभेत प्रश्न विचारायचे. त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप आणि माईकची व्यवस्था केली जायची. तीन-तीन तास सभा चालायची. त्या परंपरेला यंदा छेद देण्याचा प्रयत्न झाला. याचा अर्थ एकच आहे की उत्तरे तुम्हाला ऐकायची नव्हती. सह्याद्रीसारख्या एका उत्तुंग कारखान्यावर काहीतरी आरोप करायच, अशा प्रकारची विरोधकांची वृत्ती होती”, असा आरोप बाळासाहेब पाटील यांनी केला.

Maharashtra TimesMiraj Civil Hospital : पोलीस जेव्हा देव बनतात, मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर संकट कोसळलं, नेमकं काय घडलं?

सरकार तुमचं, लावा चौकशी, बाळासाहेब पाटील यांचं आव्हान

“एसआरआयमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मते कमी झाली. त्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. माझ्यावर वैयक्तिक आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. निवडणूक अर्जासोबतच्या शपथपत्रात मी माझ्या संपत्तीचा तपशील दिलेला आहे. सरकार तुमचं आहे, म्हणता तर मग लावा माझी चौकशी”, असं थेट आव्हान बाळासाहेब पाटील यांनी भाजपा आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांना दिलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा