• Mon. Nov 25th, 2024

    पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून प्रेयसीने खून; आंबोली घाट बनतोय गुन्हेगारांचा हॉटस्पॉट

    पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून प्रेयसीने खून; आंबोली घाट बनतोय गुन्हेगारांचा हॉटस्पॉट

    सिंधुदुर्ग : प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येची घटना २९ ऑगस्ट रोजी घडली होती. गोवा आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी संबंधित युवतीचा मृतदेह घाटातून शोधून काढला.

    प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील एका युवतीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोचले असून त्यांना तो मृतदेह सापडला आहे. तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण २९ ऑगस्टला पर्वरी येथे घडले होते. प्रकाश चुंचवाड (वय २२) असे संशयिताचे नाव आहे.

    प्रकाशने आपली प्रेयसी कामाक्षी हिचा आपल्या पर्वरी येथील फ्लॅटवर खून केला होता. तो मृतदेह गाडीतून आणून आंबोली घाटात फेकला होता. दरम्यान आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने २९ ऑगस्टला म्हापसा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पुढील तपास म्हापसा पोलिसांनी केला. यात ताब्यात घेण्यात आलेल्या प्रकाश याने आपण संबंधित युवतीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन आज गोवा पोलिसांचे पथक आंबोली येथे दाखल झाले. त्यानंतर घाटात शोध मोहीम राबवल्यानंतर खोल दरीत तिचा मृत्यू आढळून आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडीचे पोलीस निरी ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.

    सावंतवाडीतील आंबोली घाटात धक्कादायक घटना घडली आहे. आंबोली घाट हा गुन्हेगारांसाठी हॉटस्पॉट बनत चालला आहे.आतापर्यंत घाटामध्ये अनेक मृतदेह टाकण्यात आले आहेत. त्याचा शोध आंबोली पोलिसांनी घेतला आहे. खोल दरीत टाकलेले अनेक मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. मात्र अजून सिंधुदुर्ग पोलिसांनी घाटामध्ये प्रतिबंधनात्मक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. उपाययोजना केल्या जातील अस लोक प्रतिनिधीकडून सांगण्यात येत. मात्र त्या घोषणा राहिल्या आहेत.

    दहिहंडी उत्सवावरून शिंदे अन् ठाकरे गट पुन्हा भिडणार?; परवानगी देणाऱ्या पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed