• Sat. Sep 21st, 2024

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना: रक्षाबंधनादिवशी अपघात; बहिणीचा मृत्यू, भाऊ जखमी

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना: रक्षाबंधनादिवशी अपघात; बहिणीचा मृत्यू, भाऊ जखमी

दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाट्यावर चारचाकीने बहीण-भावाच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला असून भाऊ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. वैशाली नितीन शेंडगे (वय- २८, रा. नायगाव, ता. पुरंदर) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक, ता. दौंड) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली शेंडगे व विलास कोपनर हे बहीण-भाऊ आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त वैशाली शेंडगे या बंधू विलास यांच्याबरोबर दुचाकीवरून दौंड येथील बोरीभडक या ठिकाणी बुधवारी निघाल्या होत्या. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बोरीभडक फाट्यावर सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीने पाठीमागून विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Mumbai Local: मोठी बातमी: लोकलने CSMT स्थानकातील सिग्नल ओलांडला; गाड्या २० मिनिटे उशिरा, चौकशी होणार

या धडकेत वैशाली शेंडगे या रस्त्यावर पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तात्काळ उपस्थित नागरिकांनी उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बंधू विलास कोपनर यांनाही दुखापत झाली आहे

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर चारचाकी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed