• Mon. Nov 25th, 2024

    Maharashtra Politics: संजय राऊतांचा खास मोहरा शिंदे गटात, ठाकरे गटाचा आणखी एक नगरसेवक फुटला

    Maharashtra Politics: संजय राऊतांचा खास मोहरा शिंदे गटात, ठाकरे गटाचा आणखी एक नगरसेवक फुटला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रोळी, कन्नमवारनगर येथील माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सावंत हे खासदार संजय राऊत व आमदार सुनील राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. ‘आता शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या ३३ झाली असून त्यातील २५ नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

    संजय राऊत म्हणाले, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दंगली होतील; ATS पत्र धाडत नितेश राणेंचा गंभीर आरोप

    ‘राज्य सरकारची निवडणूक घेण्याची हिंमत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे केला जात आहे; मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वॉर्ड रचनेबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक घेण्यास विलंब होत आहे. निवडणुका कधीही लागल्या तरीही त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे,’ असे शिंदे यांनी या वेळी अधोरेखित केले. ‘ज्या लोकांनी निवडून दिले त्यांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील, तर नगरसेवक काय करणार? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे,’ असेही ते म्हणाले. ‘गेले दीड वर्ष माझ्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकलेले नाही. माझ्या प्रभागातील विकासकामांना गती मिळावी, यासाठी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला,’ असे सावंत यांनी स्पष्ट केले.

    माझा भाऊच ब्रँड, शिवसैनिकांची निष्ठा; मला आजही ऑफर, सुनील राऊतांचा मोठा दावा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed