• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई-नाशिक महामार्गावरील महत्त्वाच्या पुलाबाबत मोठी अपडेट; वाहतूक शाखेकडून वाहनांना निर्देश

    मुंबई-नाशिक महामार्गावरील महत्त्वाच्या पुलाबाबत मोठी अपडेट; वाहतूक शाखेकडून वाहनांना निर्देश

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे वाहतूक शाखेने शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत सक्त निर्देश जारी केले आहेत. अवजड वाहनांना नेमून दिलेल्या वेळेनंतर ही वाहने शहरात आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी दिला आहे. यासोबत पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबईत प्रवेश करताना टोलनाक्यावर नेमून दिलेल्या मार्गिकेचा वापर करण्याच्या सूचना अवजड वाहनांना देण्यात आल्याने हलक्या वाहनांचा मार्ग सुकर होणार आहे.

    मुंबईच्या एंट्री पॉईंटवर दोन दिवसांपूर्वी अवजड वाहन बंद पडल्याने ठाण्यात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, घोडबंदर, नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत मुभा दिली असताना दिवसभर जड वाहनांची घुसखोरी शहरात सुरू असते. हीच बाब लक्षात घेता ठाणे वाहतूक शाखेने आता कंबर कसली आहे. दिलेल्या वेळेनंतर संबंधित वाहन महामार्गावर आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे निर्देश ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले.

    Mamata Banerjee : इंडियाच्या बैठकीपर्वी राजकीय मैत्रीचे बंध बळकट, ममता बॅनर्जींनी बांधली उद्धव ठाकरेंना राखी

    आनंद जकात नाक्याचा टोल भरण्यासाठी वापर करा

    आनंद जकात नाका येथे अवजड वाहनांसाठी स्वतंत्र टोल मार्गिका देण्यात आली आहे. या मार्गिकांचाच वापर अवजड वाहनांनी करावा, असे निर्देश ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले. अवजड वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या एंट्री पॉइंटवर असलेल्या टोल नाक्याच्या मार्गिकेत आल्यास हलक्या वाहनांची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी राठोड यांनी सक्त सूचना दिल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed