कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायने दारुबंदीचा ठराव करण्यासाठी ग्रामसभा बोलावली होती. या सभेत दारु बंदीच्या ठरावावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दारूबंदी ठरावावरुन ग्रामसभेत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामसभेत माजी महिला जिल्हा परिषद सदस्या भूमिका मांडत असताना इतर महिलांनी विरोध केला. या गोंधळात सभेचं प्रोसिडिंगही फाडण्यात आलं. त्यामुळे दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीतून त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे सभेतील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. या गोंधळात पुरुष ग्रामस्थांनी भाग घेतल्याने गोंधळ अजूनच वाढला.

२०१६ साली गावात महिला ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता. मात्र, गावातील दोन व्यवसायिकांनी दारूविक्रीचा परवाना मागितला होता. हा परवाना देण्यास ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केला होता. त्यामुळे ग्रामसभेचे विषय पत्रिकेवर या विषयी निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गावचे संरपच हेरवडे यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र, यानंतरही वाद अधिकच वाढला. कुरुंदवाड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत हा गोंधळ मिटवला. यानंतर पुरुषांना सभेपासून बाजूला हाकलून लावत पुन्हा सभेला सुरवात करण्यात आली. अखेर गोंधळातच दारुबंदीचा ठराव कायम करण्याचा निर्णय बहुमताने करण्यात आला.