• Sat. Sep 21st, 2024
आनंदाची बातमी: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना पुण्यातून ३ विशेष रेल्वे, संपूर्ण वेळापत्रक

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकणात गणेशत्सव सर्वांत मोठा सण असतो. शहरांमधील चाकरमानी गणेशोत्सवात आपल्या गावाकडे जातात. या गणेशभक्तांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दर वर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून ‘गणपती विशेष रेल्वे गाड्या’ चालवल्या जातात. या वर्षीदेखील पुणे विभागाकडून १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी या विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष रेल्वे गाड्यांना पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांवर थांबा आहे. त्यामुळे या गाड्यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये; कार्यकर्त्यांकडून डोळे दिपवणारा स्वागत सोहळा

– पुणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

पुणे-कुडाळ रेल्वे १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकातून सायंकाळी ६.१५ वाजता सुटेल.

– कुडाळ स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

कुडाळ-पुणे रेल्वे १७ व २४ सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी कुडाळ स्थानकातून दुपारी ४.०५ वाजता सुटेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed