उद्धव ठाकरे यांनी नाग उलटा फिरून डसायला लागला, अशा शब्दात संतोष बांगर यांच्यावर टीका केली. याशिवाय ठाकरे यांनी परभणीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमावरुन टीका केली. सरकार आपल्या दारी आणि थापा मारतंय लई भारी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली. अतिवृष्टीची मदत अजून सरकारला मिळालेली नाही. कांद्याचे देखील प्रश्न आहेत, सरकारनं केंद्रासोबत बोलणी करुन मध्यस्थी करायला पाहिजे होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिलं झालाय दुसरीकडे डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार तोंडाच्या वाफा सोडतंय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
सरकार आपल्या दारी कार्यक्रम आहे पण योजना सगळ्या कागदावरी आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. भाजपमध्ये सगळ्या पक्षातून आयाराम दाखल होत आहेत. सध्या भाजपच्या निष्ठावतांची दया येते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपमध्ये निष्ठावंत सतरंज्यावर पडलेले आहेत. राज्यात डबल इंजिन सरकार होतं, आता अजित पवारांचा डबा लागला आहे. तुमची मालगाडी होईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. पक्ष फोडला आणि इतर पक्षातून नेते फोडतात, माझ्या वडिलांचा फोटो वापरणार आणि ताकद म्हणणार असं कसं चालेल, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुम्हाला घराणेशाही म्हणण्याचा हक्क नाही. तुम्ही माझा बाप चोरता तुम्हाला घराणेशाहीवर बोलायचा अधिकार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्हाला घराणेशाही संपवायची असेल तर आम्हाला देखील दोस्तशाही, मित्रांना संपावायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारी कंपन्या दोस्तांच्या खिशात घालणाऱ्यांची दोस्तशाही संपवायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्या पत्नीनं रस्त्यावर येऊन छळ करण्यापेक्षा गोळ्या घाला म्हटलं होतं. मात्र अजित पवारांचा हात धरुन हसन मुश्रीफ भाजपसोबत गेल्यानंतर ईडी त्यांच्या घराचा पत्ता विसरली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
नरेंद्र मोदींनी गुजरातमधील बिल्कीस बानो यांच्याकडून राखी बांधून घ्यावी, असं आव्हान उद्धव ठाकरे दिलं. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी असलं हिंदुत्त्व स्वीकारलेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही देशाच्या जो मुळावर आलाय त्याला भर चौकात फाशी द्या हे आमचं हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व वेगळं आहे, असं ठाकरे म्हणाले. प्रदीप करुलकर सापडला तो कुणाच्या संघटनेशी संबंधित आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस हे जपान ऐवजी गुजरातला गेलेले उद्योग परत आणू शकतील का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.