• Mon. Nov 25th, 2024

    भयंकर! डॉक्टरचा हलगर्जीपणा अन् ३ वर्षीय चिमुरड्याने गमावला जीव; ३ वेळा दिलं भुलीचं इंजेक्शन

    भयंकर! डॉक्टरचा हलगर्जीपणा अन् ३ वर्षीय चिमुरड्याने गमावला जीव; ३ वेळा दिलं भुलीचं इंजेक्शन

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन दिल्याने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी मिहानमधील एम्सचे डॉ. नितेशकुमार मुकेशकुमार शर्मा (वय २७, रा. बानसूर, राजस्थान) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. ललितकुमार गोपीचंद चहांदे (वय ३९, रा. वेनाननगर, हिंगणा) याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. संकल्प ललितकुमार चहांदे, असे मृताचे नाव आहे.

    काय आहे प्रकरण?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकल्पच्या पायाला गाठ असल्याने त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले. डॉ. नागदेवते हे त्याच्यावर उपचार करायचे. दरम्यान, त्यांची एम्समध्ये बदली झाल्याने जानेवारी २०२२पासून संकल्पवर एम्समध्ये उपचार सुरू करण्यात आले. २४ मार्चला संकल्पला एमआरआय करण्यासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले. ‘३० मार्चला एमआरआय करायचा असून संकल्पला काहीही खायला देऊ नका’, असे डॉ. शर्मा यांनी संकल्पच्या नातेवाइकाला सांगितले. त्यामुळे त्याला केवळ बिस्कीट खायला देण्यात आले. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास डॉ. नितेशकुमार शर्मा यांनी संकल्पला पहिल्यांदा बेशुद्ध होण्यासाठी इंजेक्शन दिले. त्यानंतर आणखी दोनदा त्याला इंजेक्शन देण्यात आले. एमआरआय काढताना संकल्पची प्रकृती खालावली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान निष्काळीजपणामुळे संकल्पचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी डॉ. शर्मांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    सरोज पाटलांची तब्येत बिघडली, बहिणीची विचारपूस करायला शरद पवार रुग्णालयात

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed