• Sat. Sep 21st, 2024
मालाडवासियांची ट्रॅफिपासून मुक्तता होणार, पश्चिमेकडील रस्ता उद्यापासून खुला; वाचा सविस्तर…

मुंबई : मालाड पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतुकीचा ताण आता कमी होणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी केवळ एकेरी रहदारीसाठी सुरू असलेला रस्ता उद्या, सोमवारपासून पूर्णपणे खुला होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही दिलासा मिळणार आहे.

मालाड पश्चिमेला असलेल्या आनंद मार्गावर अनेक दुकानांनी अतिक्रमण केले होते. अनधिकृत दुकानांबरोबरच एमएम मिठाईवाला आणि दिल्ली स्वीट्स शॉपकडून काही अनधिकृत बांधकामेही करण्यात आली होती. यामुळे रस्ता अरुंद झाल्याने स्थानकाबाहेर पादचारी, वाहनचालकांची मोठी अडचण होऊ लागली आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मुंबई पालिकेच्या पी उत्तर विभागाने रस्तारुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला.

कोकणवासीयांसाठी गुड न्यूज; गणेशोत्सवात रातराणी सुरु होणार, ‘अशी’ असेल सुविधा
या कामासाठी गेल्या एप्रिलअखेरीस काही बांधकामे हटवण्यात आली आणि त्यानंतर या रस्त्याच्या ज्या भागातील वाढीव अनधिकृत बांधकामे पाडली, त्या भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली. पावसामुळे हे काम काहीसे थांबले होते. मात्र, त्याला गती देण्यात आली. १३.४० मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता अनधिकृत बांधकामामुळे अवघा सहा मीटरचा झाला होता. सध्या हा एकमार्गी रस्ता असून, येथून वाहतूक सुरू आहे. तो दुतर्फा केल्याने सोमवारपासून तो पूर्णपणे खुला केला जाणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम स्थानकाबाहेरी वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

– गेल्या काही वर्षांत आनंद मार्गावरील १९९ अनधिकृत बांधकामे हटवली. यात वाढीव बांधकामांचाही समावेश

– यामध्ये चार हॉटेलांचाही समावेश

– आनंद मार्गावरील रस्त्याची लांबी ६५० मीटर

– रस्त्याची रुंदी १३.४० मीटर

– पादचाऱ्यांना आणि वाहनांच्या रहदारीला दिलासा

– येथील वाहतुकीत काही बदल करण्याबाबत वाहतूक पोलिसांशी चर्चा सुरू

Mumbai Local: लोकलमध्ये वाढला ज्येष्ठांचा टक्का; जून महिन्यात वरिष्ठ पासधारकांची संख्या तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed