• Mon. Nov 25th, 2024

    प्रतिभाताई पवार, सुप्रिया सुळे भीमाशंकरला दर्शनाला; मात्र प्रथमच वळसे पाटील कुटुंबाची अनुपस्थिती

    प्रतिभाताई पवार, सुप्रिया सुळे भीमाशंकरला दर्शनाला; मात्र प्रथमच वळसे पाटील कुटुंबाची अनुपस्थिती

    मंचर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. मात्र यावेळी त्यांच्यासोबत पवार कुटुंबीयांसोबत वळसे कुटुंब नसल्याचे पहायला मिळाले.त्यामुळे वळसे पाटील कुटुंबशिवाय पवार कुटुंबातील सदस्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे पवार आणि वळसे कुटुंबातील दरी स्पष्टपणे जाणवत होती.

    सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. प्रतिभा पवार यांच्या सोबत स्व.गोविंदराव आदिक यांच्या पत्नी पुष्पलता आदिक, सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे या देखील दरवर्षी दर्शनासाठी असतात. मात्र यंदाच्या वर्षी ते देखील नसल्याचे पाहायला मिळाले.मात्र नेहमी भीमाशंकर येथे दर्शनासाठी आल्यानंतर दिलीप वळसे पाटील किंवा त्यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील या नेहमी त्यांच्यासोबत भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत असत. यंदाच्या वर्षी किरण ताई वळसे पाटील यांची अनुपस्थिती जाणवली. आज अचानक सुप्रिया सुळे आणि प्रतिभाताई पवार यांनी भीमाशंकरला भेट देत दर्शन घेतले आहे.

    प्रतिभाताई पवार या दर्शनाला आल्यानंतर प्रथमच वळसे कुटुंब त्यांच्यासोबत दर्शनाला नव्हते. नाहीतर दरवर्षी वळसे पाटील कुटुंब त्यांच्यासोबत दर्शनासाठी जायचे. याशिवाय जेवणाचा बेतही वळसे पाटील यांच्याकडेच असायचा. पवार आणि वळसे कुटुंबाच्या इतिहासात पहिल्यांदाच वळसे पाटील कुटुंब हे प्रतिभाताई पवार यांच्या सोबत दर्शनासाठी नव्हते. त्यामुळे यंदाचा श्रावण हा नक्कीच लक्षात राहण्यासारखा आहे.

    प्रतिभाताई पवार आणि सुप्रिया सुळे यांचे स्वागत स्थानिक राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. दिलीप वळसे पाटील यांचे खंदे समर्थक देवेंद्र शहा यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती नव्हती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed