सांगली: मिरजमध्ये भरधाव वेगात असलेल्या आणि मद्यधुंद ट्रक कंटेनर चालकाने हिट अँड रन करत रिक्षा आणि चारचाकीला दिलेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ट्रक कंटेनर क्र एन एल ०१ ए इ ९५४९ वरील चालक विकास शंकर वाघमारे (४०, रा. परतूर, जिल्हा जालना) याने मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवून रस्त्यावरील येणाऱ्या वाहनांना धडक देत मिरज शहरात धुमाकूळ माजवला. प्रथम महात्मा गांधी चौक येथे चारचाकीला धडक देऊन पुढे रिक्षाला धडक दिली. मिशन हॉस्पिटलमार्गे येणाऱ्या ट्रक कंटेनरने महात्मा गांधी चौक येथे चारचाकी क्र एम एच १० सी एम ०२२७ ला धडक देऊन चारचाकी कार चालक विनोद थोरात (४०, रा. बागणी) यांना जखमी केले.

त्यानंतर पंढरपूर रोडवरील स्टेट बँकेजवळ रिक्षा क्र एम एच १० सी क्यू ०९४२ ला धडक देऊन रिक्षाचालक अख्तर काझी (३९, रा. मोमीन गल्ली, मिरज) यांना गंभीर जखमी केले. यानंतर ट्रक कंटेनरला न्यू इंग्लिश स्कूलजवळ रोखण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. तर गंभीर जखमी रिक्षाचालक आणि जखमी कार चालकास उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रक कंटेनर चालकविरुद्ध मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.