• Sat. Sep 21st, 2024

भंडाऱ्यातील आश्रमशाळेत ३७ मुलांना विषबाधा; FDA अहवालानंतर कळणार खरं कारण

भंडाऱ्यातील आश्रमशाळेत ३७ मुलांना विषबाधा; FDA अहवालानंतर कळणार खरं कारण

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : तुमसर तालुक्याच्या येरली येथील गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत गुरुवारी विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नाचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतरच विषबाधेचे मूळ कारण पुढे येणार आहे.

काय आहे प्रकरण?

येरली येथे अनुदानित आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेमध्ये एकूण ४३१ विद्यार्थी आहेत. गुरुवारी आश्रमशाळेत १४९ मुले व १५७ मुली असे एकूण ३१६ विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी दुपारी १ वाजता जेवण केले. त्यांना जेवणामध्ये आलू-वाटाण्याची भाजी, भात व वरण देण्यात आले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना तापाची लक्षणे जाणवू लागली. याविषयीची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही यांना सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान दिल्यानंतर आरोग्य पथक आश्रमशाळेत दाखल झाले. एकूण ४९ विद्यार्थ्यांना हा त्रास असल्याचे जाणवले. यात एक विद्यार्थिनी तर उर्वरित ४२ विद्यार्थिनी आहेत. तातडीने या साऱ्यांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २३ विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना रात्री १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. सध्या तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात २० विद्यार्थी भरती असून त्यांची प्रकृतीत सुधारणा आहे. तर २३ विद्यार्थ्यांवर भंडाऱ्यात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांनी दिली आहे.
५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन; या जिल्ह्याची विदारक स्थिती, चाचणीतून धक्कादायक माहिती उघड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed