म. टा. वृत्तसेवा, भोर : पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शुक्रवारपासून (दि. २५) भोरहून महाडकडे जाणारा वरंध घाट सर्व वाहनांसाठी सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तसे आदेश सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत. अतिवृष्टीच्या काळामध्ये घाटामध्ये अनेकदा अचानक दरड कोसळणे, रस्ता खचणे, भराव वाहून जाणे आदींमुळे जीवित व वित्तहानीच्या घटना घडलेल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या रेड व आँरेंज अॅलर्टमुळे २२ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी घाट बंद ठेवण्यात आला होता. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून, अतिवृष्टीबाबत अंदाज नसल्याचा अहवाल प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. दरम्यान, घाट बंद केल्यापासून नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, स्थानिक रहिवासी यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.

दरम्यान, शिरवळजवळील शिंदेवाडी ते भोरमार्गे वरंध घाटापर्यंत ७० किलोमीटरच्या अंतराच्या रस्त्याची निविदा काढण्यात आली आहे. वरंध ते राजेवाडी या मार्गाचे काम सुरू असून शिंदेवाडी ते वरंध घाट आणि पुढे राजेवाडीपर्यंत सुमारे ९२ किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सुमारे ८५० कोटी रुपयांच्या खर्चाचे काम आहे.