• Fri. Nov 15th, 2024

    दुर्धर आजार जडलेल्या लहानग्याने हट्ट धरला, राज ठाकरे थेट कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले अन्…

    दुर्धर आजार जडलेल्या लहानग्याने हट्ट धरला, राज ठाकरे थेट कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले अन्…

    पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी कार्यकर्त्यांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे पहायला मिळते. तसा अनुभव देखील अनेक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मनसेची स्थापना झाल्यापासून अनेक मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांनी बांधून ठेवलेले आहेत. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या माणुसकीचा प्रत्यय आला. पिंपरी परिसरातील दापोडी परिसरात राहणारा मनसेचा रिक्षा चालक असलेला कार्यकर्ते विजय देशपांडे यांच्या मुलाला ‘मस्क्युलर डायस्ट्रॉपी’ या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्यांच्या मुलाचे नाव देखील ‘राज’आहे. या मुलाचा राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. या छोट्या मनसैनिकाचा हट्ट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूर्ण केला. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या दापोडी येथील घरी जाऊन त्यांच्या मुलाची भेट घेतली.

    राज ठाकरे यांनी या मुलासाठी स्वत: खरेदी करुन त्याच्यासाठी खेळणी, खाऊ आणला. त्याला गिफ्ट देखील दिले. त्यानंतर राज याने राज ठाकरे यांना देखील गिफ्ट म्हणून पेन दिला. आज त्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली असल्याची भावना राज याने बोलून दाखवली. यामुळे देशपांडे कुटुंबीयांना आनंद झाला.

    तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहतो बरं का, राज ठाकरे मंचावरुन म्हणाले, अथर्व सुदामेने फक्त…

    दापोडीत वास्तव्यास असलेले विशाल देशपांडे हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या अगोदरपासून ते राज ठाकरे यांचे समर्थक आहेत. कंपनीतील नोकरीनंतर ते आता रिक्षा चालवतात. देशपांडे यांना राज नावाचा मुलगा आहे. तीन महिन्यांपूर्वी या मुलाला “मस्क्युलर डायस्ट्रॉपी” या आजाराचे निदान झाले. मुलाची राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. त्याने वडिलांकडे तसा हट्ट धरला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विशाल देशपांडे यांच्या मुलाच्या आजाराची आणि त्याची भेटण्याची इच्छा राज ठाकरे यांनी सांगितली. सोमवारी ठाकरे यांना याबाबत माहिती दिली होती. राज ठाकरे यांनी थेट तिसऱ्या दिवशीच विशाल यांच्या घरी आले. त्याच्यासोबत १५ ते २० मिनिटे गप्पा मारल्या. मुलाने पांढरा झब्बा घातला होता. त्यावर राज ठाकरे यांनी “प्रिय राज” असे लिहित स्वाक्षरी देखील केली. ठाकरे यांनी घरी भेट देत इच्छा पूर्ण केल्याने देशपांडे कुटुंबीयांना आनंद झाला.

    ज्याला दहावीत ४२ टक्के पडलेत, तो आज IAS अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय, यालाच लोकशाही म्हणतात: राज ठाकरे

    ‘राज ठाकरे आमचा विठ्ठल आहे. मी माझ्या मुलाचेही नावही राज ठेवले आहे. मुलाने राज साहेबांना भेटण्याचा हट्ट धरला होता. याबाबत साहेबांना माहिती मिळताच त्यांनी घरी येत मुलाचा हट्ट पूर्ण केला. विठ्ठलाचे पाय माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांच्या घराला पाय लागले. विठ्ठलच आम्हाला भेटायाला आल्याने मनस्वी आनंद झाला’ अशी प्रतिक्रिया विशाल देशपांडे यांनी दिली. यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या.संख्येने उपस्थित होते. आजच्या या भेटीने राज ठाकरे भावनिक झाल्याचे देखील पहायला मिळाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed