• Mon. Nov 25th, 2024

    महामोर्चामुळे आज छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल; काही मार्ग बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…

    महामोर्चामुळे आज छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल; काही मार्ग बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : बोगस लाभार्थी ओबीसी आरक्षणामध्ये घुसविले जात असल्याचा आरोप करून बंजारा राजपूत भामटा भटके विमुक्त समाज कृती समिती याच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. विविध मागण्यांसाठी महामोर्चा २३ ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजता क्रांती चौकातून सुरू होणार आहे. या मोर्चासाठी नियमित वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    या प्रकरणात वाहतूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बंजारा समाज बांधवांचा मोर्चा हा क्रांती चौक भागातून दुपारी एक वाजता निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व दत्तराव राठोड करणार आहेत. या मोर्चासाठी ४० ते ५० हजार बंजारा समाजबांधव शहरात येतील अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. हा मोर्चा क्रांती चौक येथून मानसी टी हाउस, नूतन कॉलनी, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, नागेश्वर वाडी मार्गे अंजली टॉकीज, सांस्कृतिक मंडळ, भडकल गेट, टाउन हॉल उड्डाणपुलामार्गे आमखास मैदानात जमा होणार आहे. या मोर्चाला कोणताही अडसर होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली.

    बंद असणारे मार्ग
    आज, मंगळवारी (२३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजल्यापासून ते मोर्चाचा समारोप होईपर्यंत
    खालील मार्ग वाहनांसाठी बंद राहणार आहेत.

    – गोपाल टी ते क्रांती चौक
    – सिल्लेखाना ते क्रांती चौक
    – क्रांती चौक उड्डाणपुलाची पूर्व बाजू ते क्रांती चौक
    – क्रांती चौक उड्डाणपुलाची पश्चिम बाजू ते क्रांती चौक
    – ज्युबली पार्क ते सिटी क्लब सिग्नलपर्यंत रस्त्याची डावी बाजू, एकेरी मार्ग

    पर्यायी मार्ग

    – गोपाल टी ते उत्सव मंगल कार्यालय
    – गोपाल टी ते कोकणवाडी चौक मार्ग
    – सिल्लेखाना ते खोकडपुरा मार्ग
    – सेशन कोर्ट ते क्रांती चौक उड्डाणपुलावरून अमरप्रीत चौक
    – ज्युबली पार्क ते सिटी क्लब सिग्नलपर्यंत रस्त्याची उजवी बाजू एकेरी मार्ग
    ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण, नराधमाचे संतापजनक कृत्य; विठ्ठलाची पंढरी सुन्न…
    पोलिस बंदोबस्त तैनात

    दरम्यान २२ ऑगस्ट रोजी शहरातील विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी यांना क्रांतीचौकात सायंकाळी ६ वाजता बोलविण्यात आले. क्रांती चौकातच मोर्चाच्या बंदोबस्ताची माहिती वरिष्ठांनी घेतली. ही बैठक सात वाजेच्या दरम्यान संपली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed